रविवारी आमच्या सोसायटीच्या मिटींगमधे अचानक एक डाँक्टर उभे राहीले व बोलायला लागले .त्यांनी लावलेल्या शोधावर बोलत होते... गाड्या चोरी जाऊ नये म्हणुन मोबाईलचा कसा वापर करावा . एखादा स्वस्तातला मोबाईल विकत घेऊन तो गाडीमधेच कायमस्वरुपी अाँटोअँन्सरमोडवर ठेवुन चोराचां मागोवा घेवु शकतो..आत्मविश्वासाने भरभरुन तासभराचं सुंदर भाषण व डेमो दाखवुन झाल्यावर टाळ्या व कौतुक चालु झालं..मला पण आयडीया भारीच वाटली.
मी आपला बाजुला ऊभ राहुन सौंदर्य न्याहाळताना अचानक समोर डाक्टर .. तर मी पण हात मिळवला तेवढ्यात त्याच्या खिश्यातुन मोबाईल वाजला . तर कसनुस अवघडल्यागत करत खिश्यातुन जुन्या टाईपचा नोकीयाचा फोन काढला व बोलु लागले...
मी कौतुकानं पाहत म्हटलं साहेब तु्म्ही अजुनही हा फोन कमाल हाय मानल बुवा...
तर डाँक्टर चेहर्यावर आढ्या आणुन बोलले " अहो आजकालचे चोर साले...परवाच ऩविनच आयफोन ७ घेतलेला. सिग्लनलला उभ असताना गाडीतुन मारला की हो "
मी मात्र सोसायटीच्या खिडकीतुन माझ्या गाडीकडं निर्विकार नजरेने पाहत होतो....
Thursday, February 2, 2017
मोबाईल चोर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment