Thursday, February 2, 2017

फेसबुक जंगाल

तळटीप सुरवातीलाच देण्यात येत आहे..... ( संकुचित बुध्दी ठेऊन ही पोस्ट वाचु नये तरी कोणत्याही जनावराच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी )

फेसबुक लई मोठ जंगाल हाय. त्यात लई ईपारी जनावर राहत्यात..काही कविता लिहणर्या कोकीळा असत्यात त्यांनी पहीलं कुहु नी शेवटचं कुहु...यामधीच शंभरलाईक भामटी देऊन मोकळी होत्यात.. त्यात कविता करणारे कावळांना मात्र डिमांड कमी असतीया मगं ते आपलं नामकरण स्वतःच करुन कविराज ,कविवर्य अस करुन सिटीकडं पळत्यात तिथं,मग मयताचं किवां घरगुती आवतणं फिक्स असताया त्यात लबाड कावळ कवितेच्या शेवटी नंबर लिहुन लाईकचं गिराईक बांधुन ठेवतया...

काही लांडगी ,कोल्ही आणि रानटी कुत्री पण असत्यात दिसायला सगळी एकाच जातीची पण नेहमी नुसतीच ऐकमेकावर भुकणारी त्यांना लाईकशी घेणदेणं नसतयं पण भांडताना आवाज लई झाला पाहीजे म्हणजे कस सगळे त्याच्याकंंड पाहत्यात...

काही दाढीवाली अस्वलपण असतात ते कोणाशी काय जास्त बोलत नाही पण नेहमी जंगलाच तत्वग्यान सांगत बसतात मग काय आजुबाजुला जमतो त्याच्या अस्वलांचा कळप व लाईकपण..

काही माकड नुसतीच ह्या पोस्टवरुन त्या पोस्टवर लाईक कमेंटची फळ तोडत दिवसभर ऊड्या मारत फिरत्यात आबंट गोड पांचट खवुट फळ पोस्टत बसतात...

काही सेलिब्रेटी म्हणजे वाघ ,सिहं सारखे शांत असतात त्यांच्या तीनशे चारशे लाईक फिक्स.... त्यांना पोस्टायच असेल तरच शिकारीला निघतात त्याचं पोट भरल का  त्याच्यांतल  पोस्टी काही त्याच्यांसारखच बननारे बिबळे पळवुन नेत्यात ....

पाणघोडे नेहमी चिखलफेक करण्यातच मजा घेतात त्याचं एक निळ्या पाण्यातल ग्रुपचं विश्व असत त्यांना वाटत का सगळ्यानी पाण्यातच येऊन राहाव कारण जगात पाण्याचं प्रमाण पहिल्या पासुन जास्त पसरलेलं आहे.त्यांच्या लाईक बर्यापैकी असतात....

काही गाढव तर त्यानां काही कळतच नाही ऊगाचच लाथा मारत बसत्यात .ते धड ना जंगलात मोडतात ना शहरात पण आम्ही मुळचे जंगलात़लेच म्हणनं असतं त्याचं. त्यांना लाईक पेक्षा कमेंटच्याच शिव्या पडतात..

बाकी हत्ती हरीण काळवीट जिराफ अशी शाकाहारी जनावर ही कळपानं किवां एकट्यान पण राहतात पण हल्ला झाला का सगळे धावुन येतात. ते संख्येने जास्त असतात म्हणुन त्यांचच खर अस समजुन चालायच.. त्यांना लाईक त्याचेचं शाकाहारी मित्र करतात ...

आमचे फेसबुकच्या जगंलाचे एक डाक्टरसाहेब म्हणतात फक्त चार टक्के फेसबुक जगंल आपल्या आवाक्यात असत  म्हणजे,आँनलाईन असत......बाकी नुसताच पसारा... मला पण हे पटतय.....

थेंब थेंब

मी एका मित्रा बरोबर नामांकित सर्विस सेटंरला गेलो... तिथं मँनेजरच्या केबीन मधे एक कस्टमर तावातावाने भांडत होता कारण काय की त्याची गाडी नीट धुतली नव्हती... मँनेजर बोलला परत धुवुन देतो साहेब हव तर बीलामधे पण डिस्कांऊट देऊ...

मी विचार केला नामांकीत ब्रँन्ड च्या सर्विस सेंटर ला दिवसाला दोनशे गाड्या येत्यात... त्या धुवायला दोनशे लीटर प्रमाणे चाळीस हजार लीटर पाणी लागते... म्हणजे चार टँकर लीटर पाणी रोज... त्याच प्रमाणे सोसायटी मधे रोज त्याच गाड्या वाँचमन कडुन रोज प्रत्येकी  दहा लीटर पाणी वापरुन धुतल्या जातात...
मला म्हणायचय  कोणाचीही गाडी स्वच्छ असावी व सगळ्यात ऊठुन दिसावी कोणाला पण वाटतय ... पण विचार करा मराठवाडा विदर्भ मधे गावोगावी रोज एक टँकर पाणी मिळत नाही  त्या लोकांच काय हाल असेल..
तुम्ही जर गाडीमागे चारशे रुपये फक्त धुवायला देता म्हणजे पाणी विकत घेता का.... ते पैशे फक्त त्या मालकाच्या खिश्यात जातात... तुमचं जेवढ बिल होत त्यामधुन जर चारशे रुपये वजा करुन पे करा... तेच पैशे अनुदान म्हनुण नाना पाटेकर यांच्या नाम किंवा एखाद्या संस्थेला दान करा... राहील गाडी धुवायच तर घरीच एखादी बादली मधे गाडी धुवुन घ्या...
पाणी सौरउर्जा हवा ह्या अश्या गोष्टी आहे ज्या आतापर्यंत तरी मोफतच मिळण्यासारख्या आहे.... ज्या लोकांकडे फोर व्हीलर ,टु व्हीलर गाड्या आहेत त्यांनी कृपया  करुन असे वाद करुन आपल्या विद्वत्तेचे शिवाय पैशाचे प्रदर्शन करु नये....
कुठलीही गाडी फक्त धुवुन व स्वच्छ ठेवुन जास्त काळ टिकते हा केवळ भ्रम आहे.. असच असेल तर मुबंई दिल्ली किंवा मोठ्या शहारतल्या लोकल ट्रेन ह्या कितीदा धुतल्या जातात  याचा आरटीआय तर्फे तुम्ही आढावा घेऊ शकतात... मी यासाठी नाही बोलत की मला काही माहीती नाही या क्षेत्रात वीस वर्ष कामाचा अनुभव आहे....
सुरुवात करा आपल्या पासुन सोशल मिडीया मधे खुप ताकद आहे... भलेही पोस्ट लांबलचक असेल पण विचार करा ... परीवर्तन हाच मुळ हेतु.....

मोबाईल चोर

रविवारी आमच्या सोसायटीच्या मिटींगमधे अचानक एक  डाँक्टर उभे राहीले व बोलायला लागले .त्यांनी लावलेल्या शोधावर बोलत होते... गाड्या चोरी जाऊ नये म्हणुन मोबाईलचा कसा वापर करावा . एखादा स्वस्तातला मोबाईल विकत घेऊन तो गाडीमधेच कायमस्वरुपी अाँटोअँन्सरमोडवर ठेवुन चोराचां मागोवा घेवु शकतो..आत्मविश्वासाने भरभरुन  तासभराचं सुंदर भाषण व डेमो दाखवुन झाल्यावर टाळ्या व कौतुक चालु झालं..मला पण आयडीया भारीच वाटली.
मी आपला बाजुला ऊभ राहुन सौंदर्य न्याहाळताना अचानक समोर डाक्टर .. तर मी पण हात मिळवला तेवढ्यात त्याच्या खिश्यातुन मोबाईल वाजला . तर कसनुस अवघडल्यागत करत खिश्यातुन जुन्या टाईपचा नोकीयाचा फोन काढला व बोलु लागले...
मी कौतुकानं पाहत म्हटलं साहेब तु्म्ही अजुनही हा फोन कमाल हाय मानल बुवा...
तर डाँक्टर चेहर्यावर आढ्या आणुन बोलले " अहो आजकालचे चोर साले...परवाच ऩविनच आयफोन ७ घेतलेला. सिग्लनलला उभ असताना  गाडीतुन मारला की हो "
मी मात्र सोसायटीच्या खिडकीतुन माझ्या गाडीकडं निर्विकार नजरेने पाहत होतो....