तळटीप सुरवातीलाच देण्यात येत आहे..... ( संकुचित बुध्दी ठेऊन ही पोस्ट वाचु नये तरी कोणत्याही जनावराच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी )
फेसबुक लई मोठ जंगाल हाय. त्यात लई ईपारी जनावर राहत्यात..काही कविता लिहणर्या कोकीळा असत्यात त्यांनी पहीलं कुहु नी शेवटचं कुहु...यामधीच शंभरलाईक भामटी देऊन मोकळी होत्यात.. त्यात कविता करणारे कावळांना मात्र डिमांड कमी असतीया मगं ते आपलं नामकरण स्वतःच करुन कविराज ,कविवर्य अस करुन सिटीकडं पळत्यात तिथं,मग मयताचं किवां घरगुती आवतणं फिक्स असताया त्यात लबाड कावळ कवितेच्या शेवटी नंबर लिहुन लाईकचं गिराईक बांधुन ठेवतया...
काही लांडगी ,कोल्ही आणि रानटी कुत्री पण असत्यात दिसायला सगळी एकाच जातीची पण नेहमी नुसतीच ऐकमेकावर भुकणारी त्यांना लाईकशी घेणदेणं नसतयं पण भांडताना आवाज लई झाला पाहीजे म्हणजे कस सगळे त्याच्याकंंड पाहत्यात...
काही दाढीवाली अस्वलपण असतात ते कोणाशी काय जास्त बोलत नाही पण नेहमी जंगलाच तत्वग्यान सांगत बसतात मग काय आजुबाजुला जमतो त्याच्या अस्वलांचा कळप व लाईकपण..
काही माकड नुसतीच ह्या पोस्टवरुन त्या पोस्टवर लाईक कमेंटची फळ तोडत दिवसभर ऊड्या मारत फिरत्यात आबंट गोड पांचट खवुट फळ पोस्टत बसतात...
काही सेलिब्रेटी म्हणजे वाघ ,सिहं सारखे शांत असतात त्यांच्या तीनशे चारशे लाईक फिक्स.... त्यांना पोस्टायच असेल तरच शिकारीला निघतात त्याचं पोट भरल का त्याच्यांतल पोस्टी काही त्याच्यांसारखच बननारे बिबळे पळवुन नेत्यात ....
पाणघोडे नेहमी चिखलफेक करण्यातच मजा घेतात त्याचं एक निळ्या पाण्यातल ग्रुपचं विश्व असत त्यांना वाटत का सगळ्यानी पाण्यातच येऊन राहाव कारण जगात पाण्याचं प्रमाण पहिल्या पासुन जास्त पसरलेलं आहे.त्यांच्या लाईक बर्यापैकी असतात....
काही गाढव तर त्यानां काही कळतच नाही ऊगाचच लाथा मारत बसत्यात .ते धड ना जंगलात मोडतात ना शहरात पण आम्ही मुळचे जंगलात़लेच म्हणनं असतं त्याचं. त्यांना लाईक पेक्षा कमेंटच्याच शिव्या पडतात..
बाकी हत्ती हरीण काळवीट जिराफ अशी शाकाहारी जनावर ही कळपानं किवां एकट्यान पण राहतात पण हल्ला झाला का सगळे धावुन येतात. ते संख्येने जास्त असतात म्हणुन त्यांचच खर अस समजुन चालायच.. त्यांना लाईक त्याचेचं शाकाहारी मित्र करतात ...
आमचे फेसबुकच्या जगंलाचे एक डाक्टरसाहेब म्हणतात फक्त चार टक्के फेसबुक जगंल आपल्या आवाक्यात असत म्हणजे,आँनलाईन असत......बाकी नुसताच पसारा... मला पण हे पटतय.....