हा किस्सा कालचाच.
ऑफिस ला जाण्यासाठी बस स्टोपवर पोहोचले. समोरूनच
बस नंबर ८४ गेली. ती बस
मला चाल्लीही असती पण,
थोड चालावं लागल असत इतकच. "गेली तर
जाऊदे...येईल दुसरी" (दुसरा पर्याय नव्हता)
असा विचार करून स्टोपवर बसायला गेले. (आजकाल मुंबई बस स्टोप
सुधारित स्तिथीत आहेत हे नशिबच...) फावला वेळ
मिळालाच आहे तर जरा आपला स्मार्ट फोन चेक करावा या उद्देशाने
ब्यागेत हात घालणार तितक्यात बाजूलाच
बसलेल्या आज्जीनी विचारले, "बाळ एक
मदत करशील का?" मी म्हणाले, "बोला न
आज्जी काय झाल?" म्हणाल्या, "अर्धा तास झाला इथे
थांबले आहे ..तू असेपर्यंत बस नंबर ८४ आली तर
सांगशील का? आता नजरेने नीट दिसत
नाही..." मी चकीत होऊनच
म्हणाले," अहो आत्ता तर गेली न बस
ती ८४ तर होती?
कुणाला आधी का नाही विचारलत?
आत्ता केंव्हा येईल देवच जाणे.." "अरेरे, हो का? कोणाला विचारू
पोरी..? दोघेजण होते इथे.. एक
फोनवरची गाणी ऐकत असावा..
आणि दुसरा काहीतरी कामात होता. फोनवर
काहीतरी लिहित
होता आणि गालातल्या गालात हसत होता... त्याला डिस्टर्ब करावस
नाही वाटल ग "(अस म्हणत
आज्जी चक्क मिश्किलपणे हसत होत्या )
त्यांनी डोळे मिचकावले.
(आजच्या पिढीला ओळ्खल... धन्य
हो आज्जीबाई) मी काय बोलणार गप्पच
बसले, आणि फोन काढण्यासाठी ब्यागेत घातलेला हात
तसाच बाहेर काढला. थोडस बोललो, त्यांना कळाल
कि माझ्या रुटची बस
त्यांना उपयोगाची नव्हती,
त्यांची ८४ नंबर मात्र
मला चालली असती. मुंबईत बस आणि ट्रेन
फार क्वचित प्रसंगी मनासारखी मिळते.
(अर्थात हे विधान माझ्यापुरतच मर्यादित आहे)
नाहीतर सगळा सावळा गोंधळ आणि बेभरवशाचा कारभार.
आज पहिल्यांदाच उगाचच वाटल कि, माझ्या बस
ऐवजी त्यांची बस पहिले यावी,
पण दुर्देवाने झाल उलटच, समोरून माझी बस
आली, माझी चलबिचल पाहून त्याच
म्हणाल्या, "तुला उशीर होत असेल, जा..."
मी मागच्या दाराने चढले, मागे बघितलं तर बस नंबर ८४,
जोरात ओरडले, "आज्जी तुमची बस...
चढा पटकन..." आणि परत सगळ्यांना ढकलत
मीही उतरले. कंडक्टर ने
हiसडलेली शिवी त्याला ठेंगा दाखवून,
वेडावून त्यालाच परत दिली.
आणि सरतेशेवटी बस नंबर ८४ पकडली,
आज्जींच्या बाजूला जाऊन ऐटीत बसले
देखील. का कुणास ठाऊक, त्यांच्या चेहर्यावरच समाधान
पाहून मला एकदम मस्त वाटल. माझ ऑफिस आल,
मी उतरले.. खिडकीतून
आज्जीला टाटा केला,
त्यांनीही हौशीने हात
दाखवला. मी समाधानाने पुढचा रस्ता कापत होते, अचानक
आज्जीनी दाखवलेल्या हाताचा अर्थ
लक्षात आला. त्यांनी पाच बोट दाखवली.
तो टाटा नव्हता, आशीर्वाद होता.
त्यांनी त्याच अर्थाने तो हात दाखवला होता.
मी जर त्यांना सांगितलं नसत तर पुढे
कितीवेळ त्यांना त्या बस स्टोपवर
घालवावा लागला असता कुणास ठाऊक?
मागे एक जोक वाचला होता, "आजकाल तोच माणूस ताठपणे
चालतो ज्याच्याकडे स्मार्ट फोन नाही"
अगदी खर होत ते. आपल्याच धुंदीत,
आणि सोशल नेटवर्किंग च्या नावाखाली असे
दररोजच्या जीवनातले
किती तरी आशीर्वाद आपण
मिळवतच नाही ...
थोड जड जाईल, कठीण आहे पण अशक्य मात्र
नाही. किती वेळ फुकट
घालवायचा आणि किती वेळ मार्गी लावायचा हे
आपल्याच हातात आहे.
शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक
हा हानिकारकच ठरतो. मग थोड बदलुयात का स्वतःला? मोबाईल मधून
थोडा वेळ डोक बाहेर काढून बघुयात कि जरा उघड्या डोळ्याने...
या सुंदर जगाकडे...
मयुरी चवाथे- शिंदे.
Wednesday, November 12, 2014
बस क्र.८४
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment