Wednesday, November 5, 2014

कोरठण खंडोबा

कोरठणला जाण्यासाठी पिंप़ळगाव रोठा इकडे यावे
लागते. तिथून डावीकडे कोरठण खंडोबा ३
किमी तर उजवीकडे ६
किमी वर वडगाव दर्या.
आधी कोरठण खंडोबाला गेलो. देवस्थान भले
प्रचंड झालेय. इथेही श्रद्धेचा बाजारच. मूळ
मंदिर मात्र १५ व्या शतकातले असून शके १४९१ चा अर्थात
इ.स. १४१३ रोजीचा एक शिलालेख
गर्भगृहाचा प्रवेशद्वारावर आहे.
खंडोबाची मूर्ती ही तांदळा स्वरूपात
म्हणजेच धोंड्याच्या स्वरूपात ( धोंड्यावर नाक डोळे
रेखाटलेली अशी) आहे.

No comments:

Post a Comment